पं.विनायक थोरवी, उस्ताद बहाउद्दीन डागरजी. ओंकार दादरकर विराज जोशी,शंतनू गोखले,राज शहा यांच्या गायकीने रसिक स्वरांनी चिंब .
पुणे प्रतिनिधी
पद्मश्री पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी युवान्मेष माध्यमातून तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात व्यंकटेश बिल्टकॉन तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर यांच्या माध्यमातून पं.शौनक अभिषेकी व माजी विरोधी पक्षनेते उज्वलजी केसकर यांच्या वतीने गेली अनेक वर्षे होत आहे. आहे.तसेच सायंकालीन महोत्सवाच्या सत्रात आंतरराष्ट्रीय कलाकारांचा स्वराविष्कार पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन अनुभवला
सुरुवातीला सकाळच्या सत्रात युवा कलाकार राज शहा यांच मधुर आणि भावपूर्ण गायन संपन्न झाले त्यामध्ये त्यांनी राग बैरागी गाऊन विष्णूमय जग हा अभंग सादर केला तबला जीत इनामदार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी साथ करत पं.शिवकुमार शर्मा यांचे शिष्य शंतनू गोखले यांच्या संतूर वादनाची भूरळ पडली, दमदार वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले त्यांना कार्तिकस्वामी यांनी दमदार तबला साथ केली,त्यानंतर भारतरत्न भिमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायनाने युवान्मेषाची सांगता झाली यामध्ये त्यांनी राग गायला त्यानंतर पं.भिमसेन जोशी यांनी अमरामर केलेली आता कोठे धावे मना सादर करत आजोबांची आठवण करत लहान वयातच स्वरांची हुकूमत दाखवत रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांना तबला प्रणव गुरव हार्मोनियम माधव लिमये पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सुंदर करत दुसऱ्या दिवसाची युवान्मेषची सांगता केली
सायंकाळच्या सत्रात ख्यातनाम गायक ओंकार दादरकर यांच्या गायनाने सुरुवात करत राग पूरीया धनाश्री सादर करत गुरुंनी करुन घेतलेली तालीम क्षणोक्षणी दिसत होती त्यांना तबलासाथ चारुदत्त फडके हार्मोनियम चैतन्य कुंटे यांनी केली,त्यानंतर ख्यातनाम रुद्रवीणा वादक उस्ताद बहाउद्दीन डागर यांच्या वादनात जोड आलाप,झाला,प्रतिम सादर करत राग यमन सादर केला.अप्रतिम पखवाज साथ सुखद मुंढे यांनी करत सर्व रसिकांना सुखावले त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सांगता किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं.विनायक थोरवी यांच्या गायनाला सुरूवात झाली.
त्यांनी राग बागेश्री विलंबित एकतालात सादर करत याही वयात हरकती अप्रतिम सादर करत देव पहावयासी गेलो अभंग भैरवीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली त्यांना तितकीच अप्रतिम आणि दमदार साथसंगत तबला भरत कामत हार्मोनियम सुयोग कुंडलकर,पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे स्वरसाथ सिध्दार्थ बेलमानू, दत्तात्रय वेलणकर यांनी करत दैवी स्वरांचा साक्षात्कार घडवला, संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर चे सर्व सदस्य अधिक परिश्रम घेत आहेत.