पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका व शिक्षकांच्या पत्नी यांचा महिला मेळावा रविवार दिनांक ०५/०३/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते ६.०० वाजे पर्यंत सद्गुरू मंगल कार्यालय,वाखरी येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामभाऊ यादव यांनी केले कार्यक्रमाचे उद्धघाटन राज्य संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कल्पना ढेरे यांनी भूषवले प्रमुख उपस्थिती जिल्हा सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे, जिल्हा सोसायटीची माजी चेअरमन दादाराजे देशमुख, राज्य संघाचे संपर्कप्रमुख मारुतीराव क्षीरसागर, राज्य संघाचे उपाध्यक्ष संपतराव देशमुख ,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष सरस्वती भालके, सरचिटणीस अंबुताई इतापे, आदर्श शिक्षक समिती महिला आघाडी अध्यक्ष भाग्यश्री सातपुते ज्येष्ठ मार्गदर्शिका विजया जावळे -देठे, कल्पना जगताप- भुसे, श्रीम.पुष्पा डांगे,श्रीम.सुनिता वगरे जिल्हा सोसायटीचे व्हाईस चेअरमन शेखर कोरके जिल्हा संघाचे उपाध्यक्ष नारायण घेरडे, जिल्हा संघाचे संर्पकप्रमुख आनंदराव भुसे,सहसचिव विजय जवळेकर, बाळासाहेब काळे पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय शिंदे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय वाघमारे संचालिका श्रीम.सविता बर्गे ,तालुका संघाचे सरचिटणीस राजकुमार जमदाडे, कार्याध्यक्ष विकास कांबळे, कोषाध्यक्ष राहुल आर्वे महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष वैशाली आहेर ,सरचिटणीस सुप्रिया कांबळे , कार्याध्यक्ष सई शिंदे,कोषाध्यक्ष विजया पांढरे,उपाध्यक्ष गीता माने,स्वाती डोंगरे,संघटक कांचन गोरे, इत्यादी उपस्थित होते.
सदर महिला मेळाव्यामध्ये फनी गेम मध्ये टिकली लावणे,केसात जास्तीत-जास्त स्ट्रा घालणे,केळात उदबत्ती खोचणे,संगीत खुर्ची,तळ्यात मळ्यात,लिंबु-चमचा इत्यादी खेळात सर्व महिलांनी सहभाग घेतला.
आरोग्यविषयक मार्गदर्शन डाॅ.एन एस केसकर यांनी बालकाच्या अरोग्याविषयी माहिती दिली तसेच महिलांनी स्वताःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले.
विविध गुणदर्शन अंतर्गत गीतगायन,नाटिका, कविता वाचन,उखाणे,नकला, नृत्य इत्यादी अमरजा काळे,वॆशाली आहेर, आश्वनी तावसकर,सुमन पवार,वासंती रेपाळ,वनिता बंगाळे, सविता बर्गे,अनिता वेदपाठक,सुनिता गवळी, सविता पुळुज कर,सुरेखा राऊत,अलमास शिकलगार,शिवगंगा कोरके, कविता माळी, राजश्री माने,इत्यादी महिलींनी सादर केले.
राज्य संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे यांनी मनोगतामध्ये महिलांनी स्वताःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे,महिला शिक्षकांचे वेळेचे नियोजन अतिशय चांगले असते, तसेच विद्यार्थ्यांची व मुलांची शॆक्षणिक तयारी महिला चांगली करु घेतात महिला मेळाव्या निमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
सदर महिला मेळाव्यात 5 पैठणी,11 भेटवस्तु लकी ड्राने दिल्या विविध गुणदर्शनमध्ये सहभागी महिलांना भेटवस्तु आणि सर्व महिलांना भेटवस्तु देण्यात आल्या.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब काळे पतसंस्थेचे संचालक पांडुरंग नाईकनवरे, शांताराम गाजरे महादेव बागल, दिनकरराव खांडेकर , नारायण घेरडे, नबीलाल परकाळे,अशोक माने,तालुका संघाचे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार, तालुका सोसायटीचे संचालक आनंदराव भुसे, श्री गजेद्र भालके, जिल्हा संघाचे सहसचिव विजय जवळेकर,ज्येष्ठ मार्गदर्शक सिद्धनाथ भंडारे , शंकर सुरवसे,आण्णासाहेव पवार संघाचे शिलेदार बाळु धुमाळ, उत्तम बंडगर, संदीप आहेर. महिला आघाडीच्या राजश्री माने,वॆशाली जठार, सविता कांबळे,सरस्वती बंडगर,वंदना शेटे,आश्वनी तावस्कर उज्वला यादव, कविता लोहार,कल्पना भांगे,सुनिता कुलकर्णी,इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले सदर महिला मेळावा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिक्षिका व शिक्षकांच्या पत्नी उपस्थित होत्या,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता चॊधरी व राहुल आर्वे यांनी केले कार्यक्रमाचे आभार सुप्रिया कांबळे यांनी मानले.