पंढरपूर प्रतिनिधी
गांधी कुटुंबियाचे एकनिष्ठ सहकारी पंढरपूर लोकसभेचे सलग सात टर्म लोकसभेचे नेतृत्व करणारे निष्ठावंत काँग्रेस नेते सहकारी माजी खासदार संदिपान थोरात यांचे दुःखद निधन झाले आहे. आमचे संपूर्ण कुटुंबीय त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेससाठी सात वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार संदिपान थोरात यांचं निधन झालंय. ते ९० वर्षांचे होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
संदिपान थोरात हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात. त्यांचे गांधी कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. संदिपान थोरात यांनी पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले ते १९७७, १९८०, १९८४, १९८९ , १९९१ , १९९६ आणि १९९८ असे सलग सात वेळा पंढरपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते.
संदिपान थोरात हे मुळचे माढा तालुक्यातील निमगाव येथील होते. त्यांनी माढा येथे जगदंबा सुतगिरणीची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. संदिपान थोरात हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
माजी खासदार संदीपान थोरात यांचे प्रदीर्घ आजाराने अश्विनी रुग्णालय येथे आज सायंकाळी दुःखद निधन झाले. देव मृतात्म्यास शांती देवो.
त्यांचे अंतिम संस्कार उद्या निमगाव माढा (जन्मगावी) येथे सकाळी १०:०० वाजता करण्यात येतील. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली आहे