वाडी कुरोली प्रतिनिधी
पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मोटर मेकॅनिकल या व्यवसायातील श्रीकांत ज्ञानेश्वर देठे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली आहे .
ही निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक समाधान काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्रीकांत देठे हा प्रशिक्षणार्थी पिराची करोली येथील असून त्याने सन २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये मोटर मेकॅनिकल प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने एक वर्षांचे एसटी महामंडळामध्ये अपटेंशिप पूर्ण केले. पुणे येथे इंडियन आर्मी परीक्षा देऊन ते उत्तीर्ण होऊन त्याची निवड झाली आहे. इंडियन आर्मी मध्ये जनरल रिझर्व इंजिनिअरिंग फोर्स या विभागात लेह येथे सेवा बजावणार आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याण वसंतराव काळे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे सचिव चंद्रकांत कुंभार संस्थेचे प्राचार्य संतोष गुळवे व सर्व निदेशकवर्ग या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.