पंढरपूर प्रतिनिधी
येत्या 02 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 30 मार्च ते 06 एप्रिल 2023 या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना:- पंढरपूरात यात्रे निमित्त नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड , तीन रस्ता मोहोळ रोड मार्ग विसावा येथे पार्क करावीत. 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे,सातारा,वाखरी,मार्गे येणारी इसबावी विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळीमार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर व येथे पार्कींग करावीत.
पंढरपूर शहरातीलअंतर्गत वाहतुकीबाबत:- 30 मार्च ते 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रदक्षिणा मार्ग ,महाव्दार चौक ते शिवाजी चौक,सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कार्नर ते नगरपालिका, भक्ती मार्ग ते काळा मारुती चौक हा पासेच्या वाहना व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पार्किंग व्यवस्था सूचना :- अहमनगर,बार्शी,सोलापूर,मोहोळ कडून येणारी वाहने अहिल्या चौक, तीन रस्ता मार्गे, मोहोळ रोड विसावा येथे पार्किग करतील. पुणे,सातारा,वाखरी,मार्गे येणारी वाहने इसबावी, विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर,सांगली,मिरज,सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कुल व वेअर हाउस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर येथे पार्कींग करावीत. यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्कींग, क्रीडा संकुलतसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.
एकेरी मार्ग:- कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील. संबधित भाविकांनी व वाहनधारकांनी या बदलेल्या वाहतूक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सरदेशपांडे यांनी केले आहे.