पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
तमाम हिंदू बांधवांचा व नववर्षाचा सण म्हणजे चैत्र शुद्ध गुढीपाडवा या गुढीपाडव्याला सामान्यांच्या जीवनात आनंदाचा गोडवा निर्माण व्हावा याकरता शासनाने प्रशासनाने शंभर रुपयात चार वस्तू देऊन सणाचा गोडवा सादर करण्यासाठी निर्णय घेतला परंतु या निर्णयावर अप्रत्यक्ष शासकीय व इतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने पाडवा सणावर विरजण पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण अद्यापही यावर पुरवठा विभाग व शासन स्तरावर कोणत्याच हालचाली चालल्याचे दिसून येत नसून अवघ्या चार दिवसांवर पाडवा सण आला. असून या सणावर या संपाचे मोठे संकट घोंगावत आहे.
जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून वर्षभर मोफत नियमाप्रमाणे शिधापत्रिकेवरील विनोद प्रमाणे धान्य देण्याचे जाहीर केले असून हेही धान्य शहरातील काही भागात वेळेवर शिधापत्रिकाधारकांना मिळत नसल्याचे चर्चेतून ऐकावयास मिळते याबाबत ग्रामीण भागातील दुकानदार मात्र शिधापत्रिकाधारकापर्यंत आलेले धान्य पोहोचवण्याच्या करता मोठ्या प्रमाणात प्रयत्न असतानाचे दिसून येत आहे याबाबत पुरवठा खात्याने जिल्हा पुरवठा खात्याने जातीने लक्ष देऊन धान्य पुरवठा वेळेत कसा होईल हेही पाहणे गरजेचे आहे पाडवा सण दिनांक बावीस मार्च 2023 रोजी असून या सणाला चार दिवस उरल्याने आनंदाचा शिधा पाडव्याला शिधापत्रिका धारकांना मिळणार की नाही अशी शंका शिधापत्रिकाधारकातून व्यक्त केली जात आहे.
कारण सध्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा संप असल्याने याबाबत प्रशासन पातळीवर ठोस निर्णय घेण्यास सक्षम अधिकारी नसल्याचे समजते यामुळे आनंदाचा शिधा पाडव्याला तरी मिळणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे कारण याचे नियोजन घोषणा केल्यानंतर शासनाने प्रशासनाने युद्ध पातळीवर करणे गरजेचे होते कारण तालुका विभागते मंत्रालय येथे पर्यंत शिधापत्रिका धारकांची संख्या उपलब्ध असून फक्त त्याचे नियोजन करून वाटपाचे धोरण ठरविणे गरजेचे होते परंतु तसे झाल्याचे दिसून येत नाही.
त्यामुळे पाडव्याच्या सणावर संपाचे सावट असून त्याचा परिणाम आनंदाचा शिधा यावर होणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे त्यामुळे आनंदाच्या शिधा पाडव्याच्या सणावर संपाचे विरजण पडल्याने शिधापत्रिकाधारकात नाराजी पसरली आहे.