सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, इस्टेट ऑफिसर दत्तात्रय नवले,उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. सुनीता सगट, सर्व विभागप्रमुख, सिंहगड माजी विद्यार्थी असोसिएशनचे विद्यार्थी प्रतिनिधी नागेश पाथरूट, अजित शहापूरकर आदी उपस्थित होते.सिंहगड माजी विद्यार्थी असोसिएशनची मागील वर्षातील कामगिरी आणि कार्यपद्धतीच्या तपशीलाचे वाचन कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. सुनीता सगट यांनी केले.
अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, रोजगार उपलब्धीसाठी लागणारे कौशल्य, तसेच यशस्वी कारकिर्दीसाठी आवश्यक असणारे अंगभूत गुण याबद्दल अनेक माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांना उस्फुर्त मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सहकार्यासाठी आणि योजनाबद्दल उचित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा राऊत व सुझान नदाफ यांनी केले व या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. अमोल फाटक यांनी केले व तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख,स्टुडन्ट कौन्सिलच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. अमोल फाटक,प्रा. सुप्रिया कुलकर्णी, प्रा. विनय जोकारे, प्रा. यशराज बनसोडे,प्रा. योगेश शेटे, प्रा. सुनीता सगट आणि स्टुडन्ट कौन्सिलचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.