पंढरपूर प्रतिनिधी
२१५ कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे प्रचारार्थ सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेल जिल्हाध्यक्ष संग्राम सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभागी होऊन कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.
यावेळी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य काॅग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेल प्रदेशाध्यक्ष नितीन भाऊसाहेब पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील,आ.प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने एकमुखाने या निवडणुकीच्या तयारीत सक्रिय सहभागी झाले आहेत, त्यामुळे यावेळी परिवर्तन अटळ आहे. देशात २०१४ नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने महागाई व बेरोजगारी हे प्रश्न अतिशय गंभीर केले असून, याचा परिणाम कसब्याच्या निवडणुकीत निश्चितपणे दिसून येईल. कसब्यातील जनता काम करणाऱ्यांच्या सोबत असून या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी होईल. अशी माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेल जिल्हाध्यक्ष संग्राम सुभाष जाधव यांनी दिली.
यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.