अकलूज प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे माध्यमातुन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्नातुन साकार होत असलेल्या मुंबई-सोलापुर वंदे भारत एक्सप्रेस चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते शुक्रवार दि १०/२/२०२३ रोजी मुंबई येथुन शुभारंभ होनार आहे.
सोलापुर जिल्ह्यातील टेक्सटाईल हब आणि तिर्थक्षेत्रे जागतिक वारसाला जोडण्यात महत्वपुर्ण असणार्या वंदे भारत एक्सप्रेसचे सोलापुर जिल्ह्यात आगमन झाले नंतर कुर्डुवाडी जंक्शन येथे शुक्रवार दि १०/२/२०२३ रोजी सायंकाळी ८:४० वा. स्वागत करण्यात येण्यार आहे. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही असे आव्हान विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.