पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातून पद्मावती उद्यान मार्गे टाकळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर नगरपरिषदेने सहा ते सात ठिकाणी अशासकीय पद्धतीने गतिरोधक केले आहेत त्या गतिरोधकाचा त्रास वाहन चालकांना होऊन अनेक जण जायबंदी झाले आहेत.
ही बाब अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास जिल्हा सचिव सुहास निकते तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये तालुका संघटक महेश भोसले यांनी मुख्याधिकारी माळी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे देऊन हे गतिरोधक शासकीय नियमाप्रमाणे व योग्य ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे नगरपरिषदेने यापूर्वी ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनात व पाठपुराव्यामुळे या मार्गावर गतीरोधक करण्यात आले याबाबत प्रथम अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व यानंतर पद्मावती उद्यान ते टाकळी रोड माळी वस्ती या रोडवर असलेले गतिरोधक हे शासनाच्या नियमाप्रमाणे नसून अशासकीय पद्धतीने व अयोग्य ठिकाणी केल्याने येणार जाणाऱ्या वाहनधारकांना त्याचा त्रास होत असून हे गतिरोधक म्हणजे असून अडचण नसून खुळांबा अशी अवस्था झाली आहे.
याबाबत लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधून हे गतिरोधक शासकीय पद्धतीने करण्यात यावेत अशी मागणी शशिकांत हरिदास विनय उपाध्ये सुहास निकते, महेश भोसले आदींनी समक्ष नगरपालिका मुख्याधिकारी माळी व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून या मार्गावरील गतिरोधक शासकीय नियमाप्रमाणे करून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी अशी सुचविले त्यास प्रतिसाद देऊन मुख्याधिकारी यांनी तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन या मार्गावरील अशासकीय पद्धतीने केलेले गतिरोधक शासकीय पद्धतीने नियमानुसार करण्याच्या सूचना केल्याने हे गतिरोधक शासकीय नियमाप्रमाणे झाल्यानंतर नागरिकांची वाहनधारकांची चांगली सोय होणार आहे.
यापूर्वीही अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी या मार्गावर यमाई उद्यान तुळशी वृंदावन, हॉस्पिटल, शाळा असल्याने या मार्गावरून नागरिकासह विद्यार्थी ये जा करत असतात येणारे वाहन चालक हे अति वेगाने वाहन चालवत असल्याने या मार्गावर अनेक वेळा अपघात घडले आहे या सर्व बाबी निदर्शनात आणून दिल्याने या मार्गावर गतीरोधक शासकीय नियमाप्रमाणे करण्यात येऊन नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.