महाआरती व महाप्रसाद यांचे आयोजन
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
ईगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तारखेनुसार) उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डि.जे.चा कर्णकर्कश आवाजाच्या साथीने व हिंदी-मराठी चित्रपटातील अश्लील गाण्यावर बिभत्स नाच करत मिरवणुक काढुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानांच तिलांजली देत शिवजयंती साजरी करण्याच्या चुकीच्या गोष्टीला फाटा देण्यात येऊन आदर्श पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.
नांदडगाव ता.ईगतपुरी येथे शिवजयंती निमित्त शिवरायानां वंदन महाआरती करण्यात आली. तर शिवचरित्राचे वर्णन करत स्फूर्तिदायी इतिहास उभा करण्यात आला.
सामुहिक महाप्रसादाचे वाटप करत कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाला गावातील सर्व लहान थोरानीं उपस्थीत रहात शिवजयंती उत्साहात साजरी केली.