शिवप्रतिस्ठानचा अनोखा उपक्रम
निमगाव मगर प्रतिनिधी
स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निमगाव म ता. माळशिरस येथील शिवप्रतिस्ठान व बळीराजा ग्रुपच्या वतीने महाराजांची जयंती पर्यावरण पूरक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी मल्ल सम्राट रावसाहेब मगर होते निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मूलांना नागरिकांना या प्रतिष्ठानाच्या वतीने केसरी आंबा रोपांचे मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते करुन संगोपनाची जबाबदारी प्रत्याकाने घ्यावी असें आवाहन प्रतिस्ठानच्या वतीने करण्यात आले व्याख्याते आकाश पाटील यांनी महाराजांची प्रत्येक क्षेञात दूरदृष्टी होती त्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यां समोर मांङला पाहिजे.या शिवप्रतिस्ठानचे दत्ता मगर यांच्या संकल्पनेतून ५०० आंबा रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी अकलूज बाजार समितीचे संचालक चंद्रकांत मगर नाळाचीवाङी सेवा संस्थांचे चेअरमन भारत मगर विष्णुपंत मगर,प्रा.विक्रम मगर शशिकांत गायकवाड हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर मगर, विजय मगर, मल्हारी गायकवाड परिश्रम घेतले. यावेळी महिला व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. संतोष साठे यांनी आभार मानले.