बार्शी प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब प्रांत ३२ ३४ ड-१ रिजन-१ व लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने रिजन-१ चे समन्वयक तथा लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष लायन अभियंता सागर पुकाळे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी मधील खांडवी व उपळाई या गावी येथे ई- वेस्ट ड्राईव्ह मोहीम व ई-वेस्ट कलेक्शन व ई-वेस्ट निबंध स्पर्धा दिनांक 20 डिसेंबर 2023 ते 28 डिसेंबर 2023 या कालावधी मध्ये घेण्यात आली होती.
त्यानंतर दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी कार्यक्रमाची सांगता माननीय प्रांतपाल MJF राजशेखर कापसे व ई- वेस्ट प्रांतीय समन्वयक अभियंता MJF लायन राहुल दोशी यांच्या हस्ते व प्रांतातील प्रथम महिला लायन वैशाली कापसे आणि प्रांतीय सचिव लायन सुभाष गडसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत ई वेस्ट ड्राईव्हच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करुन व ई वेस्ट कलेक्ट करुन करण्यात आले.
आपल्या प्रस्ताविक भाषणा मध्ये ला. सागर पुकाळे यांनी म्हणाले कि आम्ही ई- वेस्ट ड्राईव्ह मोहिम ही नुसती शहरापुरते काम न करता गाव ते वाड्या-वस्त्या पर्यंत या मोहीमे बद्दल जनजागृती व्हावी व याचे महत्त्व पटावे म्हणून या बार्शी तालुक्यातील छोट्याश्या गावातील या जिल्हा परिषद शाळे मध्ये ई- वेस्ट ड्राइव्ह मोहीम व ई-वेस्ट निबंध स्पर्धा घेतली असल्याचे सांगितले.
तर आपल्या अध्यक्षीय भाषणा मध्ये बोलताना प्रांतपाल राजशेखर कापसे म्हणाले की लायन्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही ई-वेस्ट मोहीम चालू केली असून पर्यावरण समतोल राखण्यासाठी ई-वेस्ट ही काळाची गरज आहे व आपल्या घरातील बंद अवस्थेतील असणारी इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे देखील घराचे वास्तू दोष होऊ शकते त्यामुळे या लायन्स च्या ई- वेस्ट ड्राईव्ह मोहीमेध्ये समाजाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन पर्यावरण वाचवावे असे अवाहन केले व आपल्या प्रांतामध्ये प्रांतीय समन्वयक लायन राहुल दोशी यांचा मार्गदर्शनानुसार रिजन-१ मध्ये लायन अभियंता सागर पुकाळे यांनी विविध शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज, सामाजिक संस्था, विविध NGO, सोलापूरातील भव्य असे इलेक्ट्रो प्रदर्शन अशा विविध ठिकाणी जाऊन जनजागृती करून ई-वेस्ट कलेक्ट करत आहेत गेली तीन-चार वर्ष झाले मी लायन सागर पुकाळे यांचे काम पाहतोय त्यांच्यावर जी जबाबदारी दिली असेल ते पूर्ण करण्यासाठी ते अतिशय तळमळीने व जिद्दीने आणि तन-मन- धनाने ती जबाबदारी पार पाडतात.
ई-वेस्ट ड्राईव्ह संदर्भात देखील त्यांनी उत्स्फूर्त काम रीजन- १ मध्ये करत आहेत व तसेच आज ही देखील त्यांनी सोलापूरातुन बार्शी येथे येऊन इतक्या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इतका छान उपक्रम राबवला असे म्हणत रीजन समन्वयक व अध्यक्ष लायन सागर पुकाळे यांच्या कार्याचा गौरव केला व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी लायन्स क्लब च्या उपक्रमाला प्रतिसाद दिल्या बद्दल व शाळेतील शिस्त व गुणवत्ता बघून या शाळेसाठी मा. प्रांतपाल यांनी शाळेला एक हजार रुपये देणगी दिली.
त्यानंतर प्रांतीय समन्वयक लायन राहुल दोशी यांनी ई-वेस्ट ड्राईव्ह म्हणजे नेमकी काय आहे कशासाठी लायन्स माध्यमातून आम्ही ही मोहीम राबवतोय याबद्दल याची अधिक सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजून सांगितली
यावेळी सचिव लायन अभियंता रविकिरण वायचळ व लायन राजेश परसगोंड तसेच जिल्हा परिषद सांगवी व उपळाई या दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.