सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर मधील शैक्षणिक दर्जा असलेले नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार परीक्षा तालुका भोर, जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर परीक्षेमध्ये नागेश करजगी ऑर्किड शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेमध्ये नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे देवाक दायमा , हर्ष झेडगे, साहिल शेख, वेदांत मालगे , श्रेयस बेजगम , धीरज चोरडिया, लवेश बागेचा , आदित्य रायकर , गाईड - सायली कांबळे, रसिका सवणे, सिद्धी साठे, प्राची बंगाळे, कार्तिकी काळे, अक्षरा घोडके, माहित जोशी, रोशनी दत्ता या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे स्काऊट गाईडचे प्रमुख लतिफा सगरी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या संचालक कुमार दादा करजगी , शाळेच्या सचिवा वर्षा ताई विभुते , शाळेचे मॅनेजर अक्षय चिडगुंपि, शाळेचे मुख्याध्यापिका रुपाली हजारे तसेच प्री प्रायमरीचे मुख्याध्यापिका अनिता अनगोंडा यांनी अभिनंदन केले.