"नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास यश निश्चित मिळेल" --- प्राचार्य राजकुमार भोरे
सोलापूर प्रतिनिधी
"नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास यश निश्चित मिळेल.विविध विषयाचे परिपूर्ण ज्ञान विषय शिक्षकांनी तुम्हाला देऊन,शिक्षणाची व संस्काराची शिदोरी तुम्हास दिली आहे. जीवनात चांगले संस्काराची जोपासना केल्यास स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकून राहता,शेवटी तुमचे यश हेच तुमचे जीवन आहे." असे भवानी पेठ येथील श्री.बृहन्मठ होटगी संचलित एस व्ही सी एस प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार भोरे सरांनी शालान्त प्रमाणपत्र परीक्षेच्या निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते परमपूज्य श्री.वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य व श्री.तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.या प्रसंगी दहावीतील विद्यार्थीनी सर्व गुरुजनांचा स्वागत गीताच्या सुमनाने तसेच लेखणी देऊन यथोचित सत्कार केला.तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्था, गुरुजन वर्ग,व शाळेतील अविस्मरणीय अनुभव सांगून या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केले.या प्रसंगी शिक्षक प्रतिनिधी गजानन कुलकर्णी व सुधा थंबद मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
तद्नंतर प्रशालेचे पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे सरांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,"प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न स्वतः केला पाहिजे.तसेच ज्यांच्याकडे जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास व निश्चित ध्येय गाठण्याची प्रवृत्ती व संकल्प आहे तोच स्वतःचा उद्धार गुरुजनांच्या आशीर्वादाने करतो.त्यालाच जीवनात यश मिळेल असे प्रतिपादन केले.
प्रशालेचे उपमुख्याद्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नंदकुमार धाये सरांनी विचार व्यक्त करताना म्हणाले," विद्यार्थ्यांचे वर्तन सुसंस्कारशील असणे काळाची गरज आहे. अन्यथा आपले व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भविष्यात कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल.अशा वेळी आत्मचिंतन करून योग्य मार्गक्रमण केले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी सुधाकर माळी सरांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कु.आकांक्षा रोडगीकर,कु. तेजस्विनी काळे, व आभार कु. आकांक्षा चिकलंडे व कु.अमूल्या कुंभार यांनी मानले.