पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर वृत्तपत्र लेखक मंच च्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे निराधार वृद्धांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले .
यावेळी वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात व्यक्त करता न येणारा असा होता. वृत्तपत्र लेखक मंचचा हा या वर्षातील पहिलाच सामूहिक कार्यक्रम, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहाने पार पडला .
यावेळी संघाचे अध्यक्ष सुहास हरिदास ,उपाध्यक्ष सीमा अवसेकर, माजी अध्यक्ष शोभाताई माळवे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय माने ,वृत्तपत्र विक्रेते संतोष कुलकर्णी, सारिका हरिदास यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रम अत्यंत छान पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार सुहास हरिदास यांनी मानले.