शेळवे प्रतिनिधी
कै. वसंतराव दादा काळे यांच्या जयंतीनिमित्त शेळवे येथे राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सई मोरे हिने उपविजेतेपद पटकावले या डान्स स्पर्धा अतिशय चुरशीच्या होत्या यामध्ये जिल्ह्यातून व जिल्ह्यबाहेरील स्पर्धकांनी भाग घेतला होता व आपला कलाविष्कार सादर केला होता. सई मोरे हिने आपल्या कलेच्या जोरावर सदर स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले .
यावेळी तीला उपस्थित मान्यवर संचालक समाधान गाजरे सरपंच गाजरे,संजय गाजरे, सदाशिव गाजरे,तुकाराम गाजरे, सुधाकर गाजरे, समाधान गाजरे, प्रशांत गाजरे,गादेगावचे उपसरपंच गणपत मोरे, व परीक्षक व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते द्वितीय क्रमांकचे बक्षीस देण्यात आले.