पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते ता.पंढरपूर प्रशालेमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांना 393 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी शिवमुर्तीचे पुजन प्रशालेचे प्राचार्य अशोक बनसोडे यांनी केले.राष्ट्रगीतानंतर "गर्जा महाराष्ट्र माझा" हे राज्यगीत बबन कोकतरे व प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सादर केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राविषयी विद्यार्थ्यांनी भाषणे झाली.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक रणजीत शिनगारे,विलास दराडे,राजेंद्र जाधव,जैनुद्दीन शेख,महेश देशमुख, देवदत्त वाघ,नितीन वायदंडे,श्रीकांत चंदनशिवे,प्रथमेश गावडे,नवनाथ लोणकर, श्रीराम खुपसे, गणेश खिलारे, गणेश पाटील, सविता इंगळे,प्रतिभा जावीर ,सरस्वती शिंदे,अंजली कापसे,धनाजी देठे,विष्णूपंत घोगले,समाधान शेजाळ,संदीप चौधरी, राजाराम घोडके,विजय पंडीत,किरण बोधले,सुभाष देवकर,बबन पवार,बाळू बनसोडे आदी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.