खडकी प्रतिनिधी
भाजपा चे पुणे शहर उपाध्यक्ष मुकेश गवळी आणि खडकी काँन्टोमेंट च्या मा नगरसेविका संगिता ताई गवळी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे खडकी पुणे शहर उपाध्यक्ष -बापूसाहेब बुरुंगले, भरत राठोड - बांधकाम आघाडी उपाध्यक्ष पुणे शहर, दत्तात्रय सावंत - महामंत्री भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर तसेच पूर्णेश अगरवाल - चिटणीस भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर, मनीषाताई कांबळे - भाजप महिला आघाडी सरचिटणीस खडकी मंडळ, नितीन शिंदे - सरचिटणीस भारतीय जनता पार्टी खडकी मंडळ , योगेश कांबळे- एनजीओ आघाडी पुणे शहर राहुल कांबळे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते