छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
रामदास साळुंखे
स्वराज्य स्थापनेत शिवरायांना साथ मिळाली ते कधीही मागे न हटणाऱ्या मावळयांची आणि किल्ल्यांची. गड किल्ले बोलू शकत नसले तरी शिवरायांप्रती त्यांची निष्ठा मावळ्यांइतकीच होती. शिवरायांच्या जीवनातील मावळे आणि किल्ले यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.
त्यामुळे शूरवीर मावळयांची नावे आणि किल्ल्यांच्या नावातून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची अप्रतिम कलाकृती साकारली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी. मावळे आणि गडकिल्ले यांच्या नावांचा अतिशय समर्पक वापर करुन शिवरायांचेे चित्र तयार केले आहे. शिवरायांचा चेहरा आणि पगडी यावर मावळयांची नावे तर पोषाख, आभूशण यावर किल्ल्यांची नावे लिहली आहेत. हे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून केलेल्या या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.