चिंचणी प्रतिनिधी
प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चुभाऊ कडू यांनी चिंचणी गावाला भेट दिली.
यावेळी चिंचणी गावातील शाळा ,अभ्यासिका, मंदिर, चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राचा परिसर आणि इथे सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. महात्मा गांधी यांनी सुरू केलेले ग्राम विकासाचे काम आपण प्रत्यक्षात पुढे नेत असल्याचे कौतुक करून गाव स्वच्छ आणि सुंदर करणे तेवढेच काम नाही तर गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवणमान उंचावणे हे सुद्धा मुख्य काम आहे हेच गांधीजींनी सांगितलं ते आपण प्रत्यक्षात करत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये महिला बचत गटाचा मॉल असून या मॉलमधून बचत गटाच्या सभासदांना महिना भराचा किराणा एक महिना भरासाठी उदार दिला जातो आणि इतर बाजारातील दरापेक्षा कमी असतो. अशा पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्याचबरोबर या ठिकाणी शासकीय व अशासकीय प्रशिक्षण यासाठी प्रशिक्षण केंद्र उभं करून त्यामधून लोकांची सोय आणि या गावाला आणखीन ज्यादाचा रोजगार उपलब्ध होईल व इथे येणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळेल. अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी चिंचणीत सुरू असलेल्या हुरडा पार्टीचा आस्वाद घेतला आणि या नाविण्यपूर्ण प्रकल्पाचे कौतुक केले .