मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी लालबाग,मेघवाडी येथील श्री म्हसोबा मंदिर समितीच्यावतीने नुकताच पाच दीवस धार्मिक उत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी माजी नगरपाल डाॅ.जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी कवी,लेखक विलास देवळेकर,पत्रकार शशिकांत सावंत,जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष नरेंद्र कुडतरकर,सचिव गिरीश साळवी,खजिनदार किशोर सावंत,माजी अध्यक्ष रमेश राणे,माजी उपसचिव शाम देसाई,सल्लागार आप्पा तोडणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.पाच दिवस संपन्न झालेल्या या उत्सवात स्मरणिका प्रकाशन,होम हवन,पालखी मिरवणुक,हळदीकुंकु समारंभ,सत्यनारायणाची महापुजा,महाप्रसाद(भंडारा),सुस्वर भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.तसेच लहान मुला-मुलींनी मल्लखांब खेळातील चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
मल्लखांब प्रशिक्षक ऋतुराज शिरोडकर यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले.उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री म्हसोबा मंदिर समितीच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रशेखर राणे यांनी केले.