पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयांमध्ये 1960 ते 1995 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे नूतन जनरल बॉडी सदस्य माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व मा.प्रा.शिवाजीराव काळुंगे माजी नगराध्यक्ष मा.नागेश काका भोसले हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व मॅनेजिंग कौन्सिल चे विद्यमान सदस्य प्राचार्य आर. डी .गायकवाड साहेब हे होते. के बी पी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी जे खिलारे व माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ.दत्तात्रय काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये महाविद्यालयाविषयी कृतज्ञता अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली व उत्स्फूर्तपणे महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी देणग्या देण्यात आल्या. व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व भोजनाचे आयोजन ही करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.चांगदेव कांबळे डॉ.बजरंग शितोळे तसेच डॉ.फैमिदा विजापूरे डॉ.बाळासाहेब बलवंत प्रा.बी .एस .पाटील प्रा.जेधे सर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.प्राजक्ता बेणारे, मंगेश देशपांडे, श्याम सावजी, पद्मा सावजी, दिलीप सुरवसे, राजेंद्र केंगार, मनू दाते, विजय परदेशी, दिनेश शहा, रामेश्वर कोरे, मुन्ना शेख, माधुरी वैद्य, मंजुषा कुलकर्णी, बाबर मॅडम, मुसा इनामदार, दीपक घोगरदरे, मुकुंद मागाडे, आशिष शहा, राजू गुज्जलवार, ज्योती पत्की, दिलीप कोरके, निर्मला भिंगे व विजय परदेशी इत्यादींनी परिश्रम घेतले.