ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस नागरी विकास सेल प्रदेश उपाध्यक्ष पदी इगतपुरी तालुक्यतील जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाड़े यांची नियुक्ति प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार नागरी विकास सेल अध्यक्ष अड़.नवीन सिंग यांनी पत्राद्वारे केली आहे.
अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सचिव सोनल बेन पटेल,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा,महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस उत्कर्षा रुपवते,प्रदेश कॉग्रेसचे सचिव भास्करराव गुंजाळ यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. मुंबई येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवड़ीचे आमदार हिरामण खोसकर,संपतराव सकाळे,जेष्ठ नेते जनार्दन माली, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले,सरचिटणीस रामदास पाटील धांडे, निवृत्ती कातोरे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव,विधानसभा अध्यक्ष किरण पागेरे,बालासाहेब लंगड़े,बालासाहेब कुकड़े,अरुण गायकर,ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर खातळे,चंदू सेठ किर्वे, बाबूराव भोर,गोपाळ भगत,नंदू पिचा, सुधाकर दुर्गुडे, ज्ञानेश्वर लहामगे, सोमनाथ कुंभार,लहू तोकडे, संतोष सोनवने,संतोष जगताप,प्रकाश पंडित महिला अध्यक्षा सविता पंडित,राजु गांगड,शांताराम क्षीरसागर, रघुनाथ किर्वे, आदिनी अभिनंदन केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील बाळासाहेब वालझाड़े हे जेष्ठ व निष्टावंत नेते आहेत त्यांनी पक्षाची सेवा गेल्या चाळीस वर्षांपासुन चालू ठेवली असुन खादी ग्रामोद्योग संघावर सलग तीन वेळा चेअरमन म्हणून आजही कार्यरत आहेत त्यामुळे अशा नेत्यांची दखल महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीने घेतल्यामुळे तालुक्याचा हा बहुमान आहे.
भास्करराव गुंजाळ
सचिव - महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी