महिंद्रा पिकप घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणून नवऱ्याने तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील शीतल नवनाथ नागणे राहणार नागणे वस्ती उपरी तालुका पंढरपूर या विवाहितेचा मृतदेह विहरीत आढळून आला होता.
या प्रकरणी मयत शीतल यांचे भाऊ गणेश प्रल्हाद आसबे राहणार खरसोळी तालुका पंढरपूर यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार मयत शीतल यांचे लग्न उपरी येथील नवनाथ नागणे यांच्या समवेत ५१ हजार रुपये हुंडा व अडीच तोळे देत १५ एप्रिल २०१२ रोजी झाले होते.लग्नानंतर मयत शीतल यांचा मागील ३ वर्षांपासून पती नवनाथ हा तिचे सासू सासरे यांच्या सांगण्यावरून मारहाण करीत छळ करीत होता.
पती नवनाथ याने दोन तोळे सोन्याचा आहेर पाहिजे असा तगादा लावला होता.त्याच बरोबर पिकअप ची मागणीही केली जात होती.सदर मागणी पूर्ण न केल्याने मयत शीतल यांचा छळ केला जात होता अशी माहिती फिर्यादी गणेश आसबे तसेच मयत शीतलच्या आईने दिली आहे.तर या प्रकरणी आरोपी विरोधात ४९८ सह भादंविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे.