सोलापूर प्रतिनिधी
नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या सहशिक्षिका लतिफा शेख यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट गाईडर पुरस्कार प्रदान करण्यात आला .बार्शी तालुक्यातील खांडवी येथे आयोजित जिल्हा मेळाव्यात गटशिक्षणाधिकारी राजकुमार तांबे यांच्या हस्ते लतिका शेख यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट गाईडर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप, जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे जिल्हा गाइड संघटक अनुसया सिरसाट उपस्थित होते . २००९पासून स्काऊट गाईड चळवळीत महत्वपूर्ण योगदान देत आहेत.
बेसिक, अॅडव्हान्स, हिमालय वुड,ए. ल. टी प्रशिक्षित असून त्याचे ३९विदयार्थाना राज्यापाल पदक व ९ विदयार्थाना राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले वैराग, बोराळ, धौत्री, श्रीपूर आदी ठिकाणी पार पडलेल्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात क्रियाशील सहभाग घेतला होता तसेच, पंजाब, हरियाणा, राजस्थान, म्हैसूर येथील राष्ट्रीय मेळ्याव्यात विद्यार्थासह सहभागी आले होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षिका लतिका शेख यांचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.