अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील श्री गुरुबम्मलिंगेश्वर मठात चन्नवीरय्या स्वामीजींच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त उद्या दि.२२ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु बम्मलिंगेश्वर कल्याण केंद्राचे हितचिंतक चन्नवीरय्या हिरेमठ यांनी आपले संपूर्ण जीवन मठाच्या उन्नती व प्रगतीसाठी घालवल्याने मठाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली, उत्तराधिकारी बम्मलिंगेश्वर देवरु यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास मैंदर्गी ,हुबळी, दुधनी, सोनपेठ व जिंतूर मठाचे पुज्य शिवाचार्यगण उपस्थित राहणार आहेत.
दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० वाजता जगद्गुरु पंचाचार्य धर्मध्वजारोहण समारंभ, सायंकाळी ७:०० वाजता प्रवचन प्रारंभ, दि.२७ फेब्रुवारी रोजी चन्नवीर चेतन प्रशस्ती प्रदान कार्यक्रम, दि.२८ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत रात्री ८:०० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ३ मार्च रोजी सकाळी ७:०० वाजता लिंग दिक्षा व अय्याचार कार्यक्रम, दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ७.०५ वाजता आत्मज्योत प्रज्वलन ,धर्मसभा व नादरात्री हास्य संगीत कार्यक्रम ,५ मार्च रोजी सकाळी ७.०० पाळणा कार्यक्रम जंगम गणाराधना, महाप्रसाद व भाव चित्राचे मिरवणूक आदी विविध कार्यक्रम होणार असून सदभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरु बमलिंगेश्वर कल्याण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.