सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक मराठी, इंग्लिश मिडियम, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम प्राचार्य विजयकुमार हुल्ले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, सोनाली धोत्रे, संगीता घोडके व भारती पाटील हे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी सामुहिक महाराष्ट्र गीत सादर केले.
वेशभुषा केलेल्या सार्थक चिंचोळी,रुपांजो धोत्रे, जान्हवी कांबळे, गायत्री गुडदोर, श्वेता पिडगुंडे, कावेरी परकीपंडला या विद्यार्थ्यांने छत्रपती शिवाजी महाराजांवर जोशपुर्ण भाषण केले.३५ विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतले.यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर सुनिता पवार यांनी आभार मानले.