मारापुर प्रतिनिधी
पंचभौतिक महोत्सव कणेरी मठ कोल्हापूर येथे माननीय काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे एकर जमिनीवर दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 मोठा कृषी महोत्सव ठेवण्यात आला आहे.तरी मारापुर मधील सर्व शेतकरी बांधव, तरुण मित्र, महिलावर्ग आपण दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता आपल्या ग्रामपंचायत मारापुर या ठिकाणाहून सदर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जाणार आहोत. यामध्ये एक बस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
आपणास दुग्ध व्यवसाय , कुक्कुटपालन, शेळी ,मेंढी पालन ,विविध प्रकारच्या पालेभाज्यांच्या बियाणे , ऊस शेतीतील तंत्रज्ञान, तसेच सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीचे प्रात्यक्षिक पाहावयास मिळणार आहे त्यातून मिळणारे उत्पादन आपल्याला पहावयास मिळणार आहे व त्यामधून भरपूर गोष्टी शिकावयास मिळणार आहेत. जवळ जवळ 200 आयुर्वेदिक डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कमीत कमी पाच ते सहा लाख लोकांची रोज हजेरी त्या ठिकाणी राहणार आहे. असा देशपातळीवर पहिला प्रयोग कणेरी मठ कोल्हापूर येथे होत आहे. हे सर्व पाहण्याची सुवर्णसंधी मारापुर ग्रामस्थांना ग्रामपंचात मारापुर यांचे वतीने मोफत आयोजीत केलेल्या शेतकरी सहल या माध्यमातून पहावयास मिळणार आहे.
तरी सर्वांना आव्हान करण्यात येथे की,ज्यांना या कृषी प्रदर्शन साठी जावयाचे आहे त्यांनी दिनांक - 15 /02/2023 पर्यंत आपले आधार कार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबर घेऊन आपली नाव नोंदणी ग्रामपंचातींमध्ये येवुन, लोकसेवक अशोक तात्या आसबे,उपसरपंच मारापुर यांच्याकडे करण्यात यावी ही नम्र विनंती.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी व त्याचे मार्केटिंग कसे करायचे यासाठी ही शेतकरी कृषी सहल ग्रामपंचायती मार्फत मोफत आयोजित केली आहे.
विनायक यादव ,लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत मारापुर