खारघर प्रतिनिधी
२ विद्यार्थींनींचे शुल्क अभावी ४ वर्षे शिक्षण रोखल्या प्रकरणी खारघर येथील नामांकित हार्मोनी पब्लिक स्कूल या शाळा मुख्याध्यापकांना महराष्ट्रा राज्य बालहक्क आयोगाने नोटिस बजावली.
खारघर येथील पालक किरण कदम यांची नोकरी गेल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते त्यांच्या दोन मुली शिकत असलेल्या हार्मोनी पब्लिक स्कूलचे शुल्क भरु शकले नसल्याने शाळेने त्यांच्या मोठया मुलीला २०१८-१९ साली हाॅल टिकिट न दिल्याने तिला दहावीच्या परिक्षेस बसता आले नाही, बाहेरुन फार्म भरून १० वि च्या परिक्षेस बसता यावे म्हणून पालक कदम यांनी शाळा मुख्याध्यापकांकडे वारंवार विनंती करूनही मोठया मुलीला टि सी न दिल्याने ती आजतागायत १० वि च्या परिक्षेस बसु शकली नाही यामुळे मुलीची ४ शैक्षणिक वर्षे वाया गेली तसेच लहान मुलीला २०१८-१९ पासून ईयत्ता ५ वि पासुन शाळेत घेतले नाही व तिचे हि शाळा प्रशासनाने शैक्षणिक नुकसान केले.
पालक किरण कदम यांनी त्यांची व्यथा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांच्या कडे मांडली, दळवींच्या मार्गदर्शनाखाली पालक कदम यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग व वाशी एस एस सी बोर्डाकडे दि ३१/०१/२०२२ रोजी लेखी तक्रार दाखल केली.
महासंघाचे नितीन दळवी यांनी त्वरित उपसंचालक संदिप संगवे, बालहक्क आयोग अध्यक्षा श्रीमती शुशिबेन शहा, व वाशी बोर्डचे अध्यक्ष श्री नितीन उपासनी यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणी कारवाईची मागणी केली.
बालहक्क आयोगाने दि ०९/०२/२०२३ रोजी हार्मोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना नोटिस पाठवुन ७ दिवसात वस्तूस्थितीचा अहवाल सादर करण्यास बजावले तसेच शिक्षणाधिकारी अलिबाग जिल्हा यांना कारवाई करण्यास पत्र पाठविले व या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे व दोन्ही विद्यार्थांनी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी कळवले.
दरम्यान उपसंचालक संदिप संगवे यांनी कारवाई केल्यामुळे कदम यांच्या लहान मुलीला त्वरित खारघर सेकटर १२ मधिल गोखले स्कूलमध्ये ईयत्ता ८वीत प्रवेश देण्यात आला व तिचे शिक्षण सुरू झाले, पण अजून तिला हार्मोनी पब्लिक स्कूल कडुन टि सी देण्यात आले नाही.
वाशी एस एस सी बोर्डाचे अध्यक्ष श्री नितीन उपासनी यांनी शाळेला पत्र पाठवून मोठ्या मुलीचे दहावी परिक्षेस बसण्यासाठीची कारवाई केली जाईल असे नितीन दळवी यांना सांगितले आहे, कारवाई प्रलंबित आहे.
महासंघाचे नितीन दळवी यांची मागणी आहे कि २ विद्यार्थींनींचे ४ महत्त्वाचे शैक्षणिक वर्षे वाया गेल्याने, त्यांचा मानसिक छळ केल्याबद्दल हार्मोनी पब्लिक स्कूल शाळा प्रशासनावर फौजदारी कारवाई शिक्षण विभाग आणि बालहक्क आयोगाने करावी, जेणेकरून असे प्रकार करण्याची कुठल्या खाजगी शाळांचे धाडस होणार नाही.