सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाकडून 'रिसर्च फंडिंग अँड प्रपोजल रायटींग ' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ. आर. एस . हेगडी यांनी केले व त्यांनी आपल्या सत्रामध्ये संशोधन करण्यासाठी लागणारा फंड कसा मिळवायचा आणि त्यासाठी कशी तयारी करायची याविषयी मार्गदर्शन केले.दुसऱ्या सत्रामध्ये सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी संशोधन प्रपोजल कसे लिहावं याविषयी मार्गदर्शन केले.तसेच परदेशी विद्यापीठात संशोधनाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.तिसऱ्या सत्रामध्ये डॉ. बी. बी. देशमुख यांनी विद्यापीठ स्तरावर संशोधन संधी आणि पुढाकार या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. एस. शिरगण आणि आभार प्रदर्शन डॉ. एस. एम. जगदे यांनी केले.
या कार्यशाळेसाठी 60 हून अधिक शिक्षक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेसाठी सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले व प्राचार्य डॉ. शंकर नवले यांचे मार्गदर्शन लाभले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले.