पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र कासेगाव अंतर्गत जागरूक पालक सदृढ बालक अभियान घेण्यात आले.
यावेळी डॉ.महेश गुरव यांचा सत्कार शिक्षक सचिन निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.ज्ञानेश सुरवसे, डॉ.दिपाली सोनवणे,आरोग्य सहाय्यक विलास सलगर उपस्थित होते.उपस्थित शिबिरार्थ्यांना डॉ.महेश गुरव मार्गदर्शन करताना म्हणाले की "आपले आरोग्य हेच आपली धनसंपदा" असल्याचे निदर्शनास आणून देत कर्तव्य पालकाचे लसीकरण बालकाचे करणे बाबत समुपदेशन केले.या शिबिरात ०१ ते १८ वयोगटातील बालके किशोरवयीन मुला-मुलींचे सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली.
हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आरोग्य सेवक सुनील माने,श्याम नारनवरे, गंगाधर कदम,महेश गोडसे, आरोग्य सेविका भोसले मॅडम, मोरे मॅडम,अशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले संस्थापक सचिव डॉ.बी.पी रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी. रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे. यांनी सर्वांचे अभिनंदन केले.