पुणे प्रतिनिधी
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांना बातमीचे वार्तांकन अनेक वेळा विपरीत परिस्थितीमध्ये करावे लागते. पत्रकार हा समाजापुढे सत्याची बाजू मांडत असतो. पत्रकारांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यासाठी पस्तीस सदोतीस फाउंडेशनच्या वतीने थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच साकळे घालण्यात आले.
पस्तीस सदोतीस फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, यावेळी शिंदे यांना त्यांच्या फोटोची फ्रेम भेट देण्यात आली, यावेळी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
पत्रकार हा अनेक ठिकाणी जाऊन बातम्या गोळा करतो, त्यामुळे अपघात तसेच दुखापत होण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे पत्रकारांना अपघाती विमा देण्यात यावा, पत्रकारांना रुग्णालयात दाखल केल्यास मेडिकल क्लेम (मेडिकल इन्शुरन्स) देखील देण्यात यावे, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये पत्रकारांना 50% उपचारात बिल मध्ये सूट देण्यात यावी. काही वेळा पत्रकारांना बातम्यांसाठी अनेक वेळा विविध ठिकाणी जावे लागते, त्याकरिता रेल्वे, बस तसेच स्थानिक बस सेवेत मध्ये विशेष 50% सूट प्रवास सूट देण्यात यावे.
राज्यामध्ये सर्व ठिकाणी टोल माफ करण्यात यावे. पत्रकारांसाठी पत्रकार निवास अल्प किमतीत तयार करून पत्रकारांनाच यामध्ये म्हाडा प्रमाणे घर देण्यात यावे. पत्रकारांना लोन बँकांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात यावी. पत्रकारांना मिल्ट्री कॅन्टीन मध्ये देखील खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, पत्रकार अमोल सहारे, अनिल बुरुंगळे, आकाश गायकवाड, निवास राठोड, अमित सणस उपस्थित होत.