मारापुर प्रतिनिधी
मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ इतिहासकार, शिवव्याख्याते डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य अशा प्रांगणामध्ये एक मार्च रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित केले आहे.
या व्याख्यानानंतर मारापुर ग्रामस्थांच्या वतीने भव्य अशा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी मारापुर व मंगळवेढा परिसरातील सर्व नागरिकांनी डॉ. कोकाटे यांच्या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे.