अकलूज प्रतिनिधी
सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय,दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग भारत सरकार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को)यांचे माध्यमातुन सामाजिक अधिकारता शिबीर व दिव्यांगजनांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी भारत सरकारच्या एडिप योजने अंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणांसाठी करमाळा,माढा,माळशिरस,पंढरपुर,सांगोला या तालुक्यातील नोंदणी झालेल्या २९३४ दिव्यांगांपैकी आज पहिल्या टप्प्यात माळशिरस तालुक्यातील १५९ दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते व अलिम्कोचे मुंबई रिजनल मॅनेंजर एस.सेनगुप्ता यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी आ.रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, की दिव्यांगांशी संवाद साधत मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन केले.
यावेळी आ.रणजीतसिंह मोहिते पाटील,धैर्यशील मोहिते पाटील,अलिम्कोचे किरण पावरा,शिवतेजसिंह मोहिते पाटील,अकलुज न.पा चे मुख्याधिकारी दयानंद गोरे,पं.स.मा.उपसभापती प्रतापराव पाटील,शिवरत्न शिक्षणसंस्थेचे सर्व संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.