मुंबई प्रतिनिधी
२०२३ या इंग्रजी नविन वर्षाचे सर्वच देशवासीयांनी जल्लोषात स्वागत केले.त्याच अनुषंगाने जेष्ठ नागरीकांसाठी काही नविन संकल्प,काव्यमय संकल्पना मंगळवार दि.०३/०१/२०२३रोजी सायंकाळी ६.३५ वाजता "अमृतकलश"या विशेष कार्यक्रमात मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहीनीवरुन सादर करण्यात आले.
या कार्यक्रमात जनजागृती ग्रुप सदस्या कवियत्री सुरेखा गावंडे,वृत्तपत्र लेखिका माधुरी भोईरकर यांनी आपले संकल्प व काव्यमय संकल्पना सादरी केली.
तसेच जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी नविन वर्षातील संकल्प विशद केले व नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी अनिलकुमार पिंगळे व निर्मिती सहाय्यक सौ.हर्षदा प्रभु यांचे विशेष सहकार्य लाभले.