पंढरपूर प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सिंहगड महाविद्यालयात मंगळवार दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डाॅ. प्रियंका दोडके यांचे "त्वचेची काळजी कशी घ्यावी" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्यात उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याख्यानाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व्याख्यात्या डाॅ. प्रियंका दोडके, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरमच्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. स्वपना गोड आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
व्याख्यात्या डाॅ. प्रियंका दोडके यांचे स्वागत प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या "त्वचेची काळजी कशी घ्यावी" या विषयावर डाॅ. प्रियंका दोडके यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिशा व्होनमाने हिने केले.
या व्याख्यानात सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डाॅ. प्रियंका दोडके यांनी उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.