समाजात विश्वास निर्माण करा समाज तुमच्या पाठीशी राहील,उद्योगपती अनिल ढवळे
सोलापूर प्रतिनिधी
समाजात विश्वास निर्माण करा समाज तुमच्या पाठीशी सदैव रहाते कुठलीही संस्था निस्वार्थपणे व पारदर्शकता पणे समाजात काम करत असल्यास त्याच्या मागे पूर्ण समाज कायम रहाते असेच काम सोलापूर युबो चे आहे त्यामुळेच सोलापूर भावसार समाजात एक वेगळीच ओळख व वेगळीच छाप पाडण्यात युबो सोलापूर यशस्वी ठरली आहे
युबो सोलापूर ने गेली 3 वर्षे समाजासाठी केलेली कामे निश्चितच कौतुकास्पद आहेत असे गौरव उदगार उद्योग पती श्री अनिल जी ढवळे यांनी
युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन च्या पद्ग्रहण सोहळ्यात केले
युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन चा सोलापूर या शाखेचे अध्यक्ष म्हणून सिद्राम हंचाटे ,सचिव रवी लाडे ,खजिनदार प्रभाकर कुसुमकर व इतर संचालक मंडळाचा शपथविधी समारंभ IMA हॉल येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला
त्यावेळी प्रमुख पाहुणे उद्योगपती अनिल ढवळे ,ABBk महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गिरीश वायचळ , नगरसेवक राजकुमार हंचाटे भावसार युवा चे राष्ट्रीय अध्यक्ष राम सरवदे , , युबो चे राष्ट्रीय अध्यक्ष अश्विन डोईजोडे
माजी गव्हर्नर सुहास क्षीरसागर दीपक आकुडे राजेश झिंगाडे तसेच मावळते ज्योती क्षीरसागर उपस्थीत होते
त्यावेळी पुढे बोलताना अनिल ढवळे म्हणाले की समाजाची गरज काय आहे हे बघून युबो सोलापूर हे काम करीत आहे
युबो भावसार समाजातील कोणीही विद्यार्थी पैसा वाचून शिक्षणाला वंचित राहू नये म्हणून जी तळमळ दाखविते तसेच त्यांना मदत ही करते हे बघून खरच मी युबो चे कौतुक करतो
माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी सुंदर अशी भावसार वैकुंठ भूमी तयार करण्यात मोठे योगदान केल्याबद्दल युबो सोलापूर तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला
त्यांनीही युबो च्या कार्यास शुभेच्छा देत सर्वतोपरी मदत करायचे आश्वासन दिले श्री सिद्राम हंचाटे यांनी मावळते अध्यक्ष सौ ज्योती क्षिरसागर यांच्याकडून 2023च्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला
युबो चे संस्थापक सदस्य तसेच राज्याध्यक्ष गिरीश वायचळ यांनी नूतन अध्यक्ष श्री सिद्राम हंचाटे , सचिव रवी लाडे, खजिनदार प्रभाकर कुसुमकर यांना शपथ दिली.नूतन संचालकांना राष्ट्रीय अध्यक्ष अश्विन डोईजोडे यांनी शपथ दिली युबो सोलापूर या संस्थेत नव्याने आलेल्या सागर पुकाळे,प्रकाश भाबुरे,अनिता भांबुरे,अतुल रणसुभे,प्रशांत हिब्बारे व इतर 8 सदस्यांचा शपथविधी nwc सदस्य सुहास क्षीरसागर यांनी केला
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत रंगदाळ ,लक्ष्मीकांत मुसळे सागर सरवदे मनोज क्षीरसागर प्रभाकर जवळकर सुषमा डोईजोडे रवी वायचळ संजय पतंगे, माधव वळसे, मेघा पतंगे , ज्योती झिंगाडे यांचा सहभाग होता
परिवहन सभागृह नेते विजय पुकाळे तसेच भावसार महिला मंडळ चे अध्यक्ष सौ सरिता जवळकर समाजातील विविध संस्थेचे प्रतिनिधी तसेच भावसार समाजातील प्रतिष्ठीत नागरिक या कार्यक्रमला उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले तर आभार नूतन सचिव रवींद्र लाडे यांनी केले.