नाशिक प्रतिनिधी
रविवार दिनांक 8 जानेवारी नाशिक येथे कोष्टी कला मंचच्या वतीने कोष्टी कला संगीत महोत्सव 2023 अंतर्गत गीत ,संगीत ,काव्य, पारितोषिक वितरण व कलारत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कलारत्न पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री प्रकाशराव सातपुते, किरण तारळेकर व नाशिक महापालिकेच्या माजी नगरसेविका सौ छायाताई देवांग इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. श्री प्रकाशराव सातपुते यांचे शुभ हस्ते श्री गणपतराव आवनकर, नागडे (येवला) सौ सायली होगाडे, इचलकरंजी, श्री रवींद्र खोडवे ,यवतमाळ. इत्यादीचा तसेच तबला वादक श्री ज्ञानेश्वर दुधाणे करकंब, यांचा सत्कार श्री किरणराव तारळेकर, व इतर कलारत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
प्रारंभी स्वागत श्री सिद्धार्थ पन्हाळे यांनी तर प्रस्ताविक श्री सुनील एकार यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार श्री श्रीकांत शेळके, सतीश पन्हाळे ,परमेश्वर गलांडे,सौ सुषमा दवंडे इ.नी केला.
याप्रसंगी नादब्रह्म या विशेष अंकाचे प्रतीकात्मक प्रकाशन प्रकाशराव सातपुते व विजयराव लोळे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर श्री विजय कलढोने , सौ मंदाताई टकले महासचिव - श्री रामचंद्र निमनकर इ. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नाशिक देवांग कोष्टी समाज अध्यक्ष श्री राजेंद्र भुजबळ व कार्याध्यक्ष श्रीकांत शेळके यांच्या कुशल नेतृत्वाखाली केले होते .त्यांचा तसेच महिला मंडळ अध्यक्षा सौ सुषमा दौंडे यांचा सत्कार कोष्टी समाजसेवा मंडळाचे वतीने करण्यात आला. कार्यक्रमास संपर्क दौरा सदस्य दिलीप भंडारे व श्री शुभम रोकडे उपस्थित होते.