पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज,कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये परकीय देशामधील शिक्षण व नोकरी परिसंवादाचे आयोजन आले होते.यामध्ये बी.सी.ए व बी.एस्सी. (ईसीएस) मधील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षाच्या ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.परकीय देशांमध्ये असणारे शिक्षणाचे असणारे फायदे,अटी, नियम व तसेच शिष्यवृत्ती योजना याविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी युनायटेड किंगडम, कॅनडा, अमेरिका, जपान ,ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये असलेल्या शिक्षणाविषयी व नोकरीच्या संधी विषयी असणारे पॅकेज, पात्रता याविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांनी परकीय देशांमध्ये शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाण्याची प्रक्रिया,पात्रता आणि त्यानंतर असणारे फायदे याविषयी सविस्तर मारगदर्शन कौशिक गांधी.(Alliance Mystudio,Pune)
यांनी केले.अशी माहिती महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले व प्राचार्य डॉ.ए.एस.भोईटे यांनी दिली. तसेच कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते कौशिक गांधी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.हा परिसंवाद पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा.मुकुंद चौगुले, दिनेश पवार,तसेच विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.हा परिसंवाद यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.