पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर आणि परिसरातील ग्रामीण भाग तसेच मंगळवेढा,सांगोला ,माळशिरस,मोहोळ तालुक्यातील अनेक गावातील लोक पंढरपूर येथील जाधव क्लिनिक व जाधव हॉस्पिटल मध्ये वेगवेगळ्या आजार व रोगांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी एक नवसंजीवनी ठरलेल्या डॉ.अजित व बंधू डॉ.सुजित देवदूताप्रमाणे सेवा देत आहेत.
कोरोना काळातील भयंकर परिस्थितीत शांत आणि संयमी स्वभाव असलेले डॉ.अजित यांनी रुग्णांवर आपुलकीने,धैर्याने उपचार पद्धती अवलंबून कोरोना ग्रस्त लोकांना आधार देत त्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन साधून पूर्ववत परिस्थिती आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले.आणि या जटिल समस्या व प्रसंगावर मात करून विजय मिळवला.
डॉ.जाधव बंधू यांनी हॉस्पिटल व क्लिनिक सुरू केल्यापासून तीन - सहा महिन्याच्या कालावधीतून सर्व रोग तपासणी शिबिर व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते.यातून रुग्णांस भविष्यात येणाऱ्या अडचणी व धोके यांची माहिती तर कळतेच पण त्यावर सतर्कता बाळगण्यासाठी उपचार पद्धती सुरू केली जाते.
ग्रामीण भागातील एक विश्वासू वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ,नामवंत डॉक्टर म्हणून जाधव बंधूंचे सहकार्य तर आहेच पण अल्पावधीत नावारूपाला आलेल्या या सेवारुपी रोपट्याचे लवकरात लवकर वटवृक्ष व्हावा ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
काल डॉ.अजित जाधव यांचा वाढदिवस होता.या निमित्ताने शुभेच्छा आणि त्यांच्या नियोजित भावी काळातील सर्व कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना बळ,बुद्धी आणि जाधव परिवाराची प्रगती होत राहो याच या निमित्तानं शुभेच्छा.
काल डॉ.अजित जाधव यांना वाढदिवस शुभेच्छा देताना तेज न्यूजचे प्रतिनिधी व पळशी गावचे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील प्रा.अशोक लोखंडे,प्रा.सौदागर झांबरे,प्रा.स्वप्नील लोखंडे व रामदास लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.