सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मराठी हस्ताक्षर व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आले.
प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजयकुमार हुल्ले व प्रमुख अतिथी कस्तुरबा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. नीता भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमादेवी कुंभार व सिद्धाराम कुंभार उपस्थित होते.
*वक्तृत्व स्पर्धा* - लहान गट अक्षया सुंकनपल्ली, कांचन शिंदे , आरती मामड्याल मोठा गट वैष्णवी कोंकती, लावण्या चिद्रे, विजयालक्ष्मी देगील
*निबंध स्पर्धा* -लहान गट प्रतीक्षा हंचाटे, कांचन शिंदे, अक्षरा लोमटे, मोठा गट- निकिता अजनाळकर,कोमल कुंभार, रम्या नका
*मराठी हस्ताक्षर स्पर्धा* -लहान गट- सृष्टी बोरामणी, आरती म्हंता, यशोदा पुजारी मोठ्या गट- कोमल कुंभार, प्रतीक्षा बुदाराम, धनेश्वरी अक्का
*इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा-* लहान गट- अर्चना म्हता, आकांक्षा सोमा, अक्षया गुंडेटी मोठ्या गट- भावना उसाकोयल, विद्या मोने, विद्यालक्ष्मी देगील आदी विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विश्वराध्य मठपती यांनी केले.
नेताजी जयंतीनिमित्त एम .के.फाऊंडेशनतर्फे १००० वह्यांचे वाटप.
नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेत भारती नरोळे व प्राचार्य शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले यांच्या हस्ते सागर सिमेंटचे व्यवस्थापक तथा एम .के.फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन जगदेवी निंबर्गी यांनी केले.कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी जगदेव गवसने, राजशेखर पाटील प्रशांत बत्तुल, सुनिता पवार आदींनी परिश्रम घेतले.