सोलापूर प्रतिनिधी
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, सत्यशोधक, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी माहिती दिली की, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा ज्योतीबा फुले यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, बसवराज म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, चेतमल गोयल, संजय गायकवाड, नूर अहमद नालवार, लखन गायकवाड, रमेश फुले, शकील शेख, सुमन जाधव, विनाताई देवकते, शोभा बोबे, अंजलि मंगोडेकर, अरुणा बेंजरपे, मुमताज शेख, श्रीकांत दासरी, स्नेहल शिंदे, लता सोनकांबळे, नागनाथ शावने, पूजा नेल्लूरवार, महेश सर्वगोड़, नीता बनसोडे, शशिकांत जाधव, रुकैयाबानु बिराजदार, सलीम मनुरे, अनिता भालेराव,बसंती सालुंखे, चंदा काळे, रेखा बिनेकर, द्रौपदी शिवशरण, हाजी महमूद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.