चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम चा रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आ. किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले.वृद्धाश्रमातील माता भगिनींनी अगदी प्रेमाने आनंद व्यक्त केला, या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून असंख्य वृद्ध लोकांना निवारा उपलब्ध करून दिला जातोय संस्थेचे हे कार्य अगदी स्तृती योग्य आहे.
यावेळी चंद्रपूर चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, किर्तीकुमार भांगडिया, सुभाष धोटे, प्रतिभाताई धानोरकर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई फडणवीस यांना आ. किशोर जोरगेवार यांनी शुभेच्छा दिल्या.