पंढरपुर प्रतिनिधी
पंढरीच्या आरोग्य क्षेत्रात नव्याने सुरू झालेल्या संजीवनी पेटकाईंड लॅब नक्कीच सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी अग्रेसर राहिल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळे यांनी केले.
चेअरमन कल्याणरावजी काळे म्हणाले की डॉक्टर अनिल काळे यांनी पंढरपूर मध्ये नव्याने सुरू केलेल्या पॕथकाइंड लॅबच्या माध्यमातून तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना अल्प दरात घरबसल्या आपल्या आरोग्याची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध केली असून चाचणीचा रिपोर्ट आपल्या मोबाईलवर घरपोच मिळणार आहे. तरी रुग्णांनी या सुविधाचा लाभ घ्यावा असे काळे यांनी सांगीतले.
पंढरपूर येथे संजीवनी पॕटकाइंड लॅब उद्घाटन समारंभ सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळे ,IMA पंढरपुर आध्यक्ष डॉ. पंकज गायकवाड यांचे शुभहस्ते व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेशकुमार माने, होमियोपॕथी अध्यक्ष मृदुला तळेकर, वसंतदादा काळे मेडीकल फाउंडेशन अध्यक्षा संगिता काळे, सौ.सुनिता काळे, डॉ.किशोर बागडे यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे मा.चेअरमन महादेव देठे, डॉ.सुधीर शिनगारे, अर्जुन जाधव, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक समाधान दादा काळे, धनंजय काळे, शैलेश पटणे, अतुल राणे,कौस्तुभ घाटुळे, सत्यवान नाईकनवरे, डॉ.आजित काळे, बाबासो काळे,योगेश काळे, सद्दाम मणेरी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे भाषणे झाली,कार्यक्रमाचे सुञ संचालन समाधान काळे यांनी केले.यावेळी रुग्ण, डॉक्टर,पदाधिकारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.