पंढरपूर प्रतिनिधी
श्री.दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम ' कलाविष्कार' मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये प्रशालेतील व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन कलाविष्कार या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर सादर केले. महाराष्ट्राची विविध परंपरा, राष्ट्रीय एकात्मता ,देशभक्तीपर गीते, विविध वेशभूषा अशा विविध कार्यक्रमावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी साजरा केला यामध्ये रिमिक्स गीते,कोळी गीते, पोवाडा ,गवळण ,गोंधळ गीत , पिंगळा, देशभक्तीपर गीत अशा विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी नयन मनोहर असे सुंदर नृत्य साजरे केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव ॲड. वैभव टोमके यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर ,खजिनदार सलीम वडगावकर, हे संचालक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे यांनी परिश्रम घेतले त्यांना प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, मुख्याध्यापक तुकाराम कौलगे,पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी शिक्षक प्रतिनिधी सुनील विश्वासे,प्रसिद्धी प्रमुख राजूभाई मुलाणी, सोमनाथ फडतरे, मधुकर भोसले,सविता उपलप, क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे,राहुल दळवी,युवराज परचंडे,दिलीप रानगट्टे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.