सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
.
व तसेच प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रा. अझहरुद्दीन शेख, सचिन नवले तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.