सोलापूर प्रतिनिधी
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर महाराजांच्या यात्रेला ९०० वर्षाची परंपरा आहे या यात्रेच्या कालावधीमध्ये जगभरासह शेजारील जिल्ह्यातूनही अनेक भाविक येथे गर्दी करतात. गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे ही यात्रा बंद होती. यावर्षी कोरोना नाही. त्यामुळे यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे.
श्री सिध्देश्वर यात्रेतील नंदीध्वजचे मानकरी सोमशेखर ईरप्पा भोगडे यांच्या घरी आज दिप लावण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवलिला भोगडे,नेहा भोगडे, नितीन भोगडे, श्रीमती विजयालक्ष्मी हिरंडगी आणि सर्व पाहुणे, मानकरी यांना महाप्रसाद कार्यक्रम करण्यांत आला होता.