ओझेवाडी प्रतिनिधी
खिलारवाडी ता. सांगोला येथील प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांची नुकतीच अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावरती कुलगुरू नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली आहे.
त्यांनी एम फिल ही पदवी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ग्रामीण नेतृत्वाचा एक अभ्यास यावरती मिळवली आहे .तसेच पीएच.डी .ही पदवी शरद पवार आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन एक चिकित्सक अभ्यास यावरती मिळवलेली आहे. तसेच ते विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर रयत सेवक संघ सातारा कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संघटनेचे खजिनदार आहेत.
त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. तसेच कोल्हापूरचा सत्यशोधक पुरस्कारही मिळालेला आहे. त्याचबरोबर जन मंगल सामाजिक संस्थेचा जीवन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे.
सध्या प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल हे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय स्वायत्त पंढरपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या सर्व यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.