पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ,पंढरपूर संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथमतः प्रतिमेचे पूजन प्रशालेतील जेष्ठ शिक्षिका सौ.एस.एस इंगळे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य ए.एम बनसोडे यांनी स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्राबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन प्रेरीत केले.तर पर्यवेक्षक आर.डी शिनगारे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्राबद्दल व राष्ट्रीय युवा दिनाबद्दल विवेचन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य ए.एम बनसोडे,पर्यवेक्षक आर.डी शिनगारे,व्ही.एस दराडे,एस.जे कट्टे, डी.एस भाजीभाकरे,एम.व्ही देशमुख,जे.सी शेख,डी.ए वाघ,एन.एम वायदंडे,एस.व्ही चंदनशिवे,जी.के पाटील,एन.एम लोणकर,जी.एस खिलारे,बी.एल कोकतरे,डी.एम देठे,एस.एन शेजाळ,एस.एस चौधरी,आर.बी घोडके,व्ही.डी पंडीत,सौ.एस.डी शिंदे,सौ.ए.सी कापसे,एस.आर देवकर,एस.सी निंबाळकर,बी.जे पवार,बी.एस बनसोडे तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.